लहान मुलांमधील मोतीबिंदू

Cataract treament in Swargate, Sinhagad Road & Parvati Pune

लहान मुलांमध्ये कसा काय मोतीबिंदू होईल? तो तर generally म्हाताऱ्या माणसांना होतो ना?
नाही, असं नाही.
काही लहान मुलांना जन्मजात मोतीबिंदू असू शकतो ज्याला congenital cataract म्हणले जाते तर काही लहान मुलांना वाढीच्या वयात मोतीबिंदू होऊ शकतो ज्याला developmental cataract असे म्हणले जाते. तसेच डोळ्याला मुका मार/ टोकदार वस्तूने आरपार जखम झाली असेल (blunt trauma/ penetrating eye injury) तरीही मोतीबिंदू होऊ शकतो ज्याला traumatic cataract असे म्हणले जाते.

ह्याची लक्षणे काय असतात?

१.लहान बाळ साधारण 3 महिन्यांचे झाले की त्याची
नजर स्थिरावते, वयाच्या तिसऱ्या महिन्यानंतरही जर बाळ आईकडे नीट पाहत नसेल तर मुलाच्या डोळ्यात काहीतरी बिघाड आंहे असे लक्षात घ्यावे आणि लहान मुलांच्या डोळ्याचा डॉक्टरांना दाखवावे
२. चित्रात दाखवल्याप्रमाणे डोळ्यातील काळ्या बुबुळाच्या मध्यभागी जर पांढरा डाग दिसणे
३. बाळाचे डोळे आपोपाप हलणे
४. डोळ्यात तिरळेपणा/ तिरकेपणा येणे, प्रखर प्रकाशात डोळे घट्ट मिटून घेणे

यापैकी काहीही लक्षणे दिसल्यास त्वरित बाल नेत्ररोगतज्ञ (Paediatric ophthalmologist) ना दाखवणे

का होतो लहान मुलांना मोतीबिंदू?

१. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींमध्ये / सख्ख्या भावंडांपैकी कुणाला जन्मजात मोतीबिंदू असल्यास
२. बाळाच्या आई वडिलांचे लग्न नात्यातील असल्यास
३. बाळाच्या आईला बाळ पोटात असताना पहिल्या 3 महिन्यात काही जंतुसंसर्ग झाला असल्यास (TORCH infections)
४. बाळाचे डोळ्याचे आधीच काही operation झालेले असल्यास
५. मुलाला डोळ्याला मार लागला असल्यास
बऱ्याच cases मध्ये अगदी खूप शोधूनसुद्धा कारण सापडत नाही
६. मुलाला चयापचायचे काही विकार असल्यास (metabolic disorder)

यावर इलाज काय?

बालनेत्ररोगतज्ञांना दाखवल्यावर हा मोतीबिंदू जर नजरेच्या वाढीच्या आड येत असेल ( visually signi ficant) असे त्यांना वाटले तर बाळाला operation ची लगेच गरज लागते.
जन्मजात असलेल्या मोतिबिंदूचे operation बाळ २.५ महिन्याचे व्हायच्या आत करावे लागते. हे operation रक्त लघवीच्या आवश्यक तपासण्या करून पूर्ण भुलीखाली (General anaesthesia खाली) करावे लागते.

Operation उशिराने/ बाळ मोठे झाल्यावर केले तर काय होईल?

बाळाची नजरेची वाढ, डोळा आणि मेंदू यांचा ताळमेळ पहिल्या काही महिन्यात खूप वेगाने बसत असतो. जर मोतिबिंदूमुळे बाळाला स्पष्ट दिसत नसेल तर हा नजरेचा सर्वांगीण विकास खुंटतो आणि नजर मागे पडते ,ज्याला lazy eye किंवा amblyopia असे म्हणले जाते.
Operation जेवढे लांबवू तेवढे चांगले results म्हणजेच चांगली नजर तयार व्हायची शक्यता कमी कमी होत जाते.

Operation केल्यावर काय काळजी घ्यावी लागते?

१ महिना बाळाच्या डोळ्यात औषधे घालावयास लागतात, डोळ्यात पाणी जाणार नाही, हात लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
बाळ 1 वर्षापेक्षा कमी वयाचे असेल तर त्याच्या डोळ्यात लेन्स घालता येत नाही, अशा वेळेला तो २.५ ते ३ वर्षाचा होईपर्यंत त्याला सतत चष्मा लावायला लागतो आणि वेळोवेळी तपासायला जावे लागते, कधीकधी तपासणी भुली खाली सुद्धा करावी लागते.
मूल मोठे असल्यास operation मध्ये लेन्स घालता येते आणि त्यानंतर मुलाला जवळचा चष्मा लागतो.

वेळोवेळच्या तपासण्या आणि आळशी डोळ्यांसाठी दिलेले व्यायाम या operation नंतर करावयाच्या 2 गोष्टी, operation इतक्याच महत्वाच्या असतात.

डॉक्टरांच्या इतकाच या आजाराच्या इलाजामध्ये पालकांचा सहभाग आणि समयसूचकता महत्वाची असते.

डॉ निशिता बेके- बोर्डे
MBBS MS DNB FPOS
बालनेत्ररोगतज्ञ
पुणे